पंधरा वर्षांपासून साटवली मुस्लिमवाडीत खुलेआम वीज चोरी!
महावितरणच्या दुर्लक्षामुळे सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप; तातडीने कारवाईची मागणी
(लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण)
लांजा तालुक्यातील साटवली मुस्लिमवाडी येथे गेले तब्बल पंधरा वर्षांपासून 11 KV लाईनवर आकडा टाकून वीज चोरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या संमतीनेच चालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या परिसरातून जाणारी उच्चदाब वीजवाहिनी स्पष्टपणे दिसत असून, यावर आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जात आहे. याची माहिती स्थानिक नागरिकांनी वारंवार महावितरणच्या वायरमन व अधिकाऱ्यांना दिली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
या प्रकरणावर प्रकाश टाकताना मुस्लिमवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलावर नूरमोहम्मद बरमारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, “हे सर्व महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्यच नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी वीज चोरी तात्काळ थांबवून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
#वीजचोरी #साटवली #लांजा #महावितरण #सामाजिककार्यकर्ता #RatnagiriNews #विद्युतचोरी #JitendraChavanReports