दापोलीतील वांझळोलीतील कुशिनारा बुद्ध विहारात संयुक्त जयंती महोत्सव संपन्न
नवी मुंबई (मंगेश जाधव).
वांझळोली बौद्धजन सेवा संघ मुंबई / ग्रामीण आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६९ वा. जयंती आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वा संयुक्त जयंती महोत्सव कुशिनारा बुद्ध विहार कमिटीच्या वतीने नुकतीच कुशिनारा बुद्ध विहार, मु. वांझळोली (बौद्धवाडी), पो. मांदिवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे साजरा करण्यात आला.
विहार कमिटी चे अध्यक्ष डॉ. अशोक अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ग्रामीण अध्यक्ष सुरेश अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी अशोक अहिरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी कनिष्क अहिरे, राहुल अहिरे यांनी गित गायले, तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला मुंबई अध्यक्ष समीर तांबे आणि कार्यकरणी, ग्रामीण अध्यक्ष सुरेश अहिरे आणि कार्यकरणी तसेच महिला मंडळच्या अध्यक्षा मनीषा तांबे आणि कार्यकरणी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश अहिरे, मनोज तांबे, निलेश तांबे यांनी केले तर राहुल अहिरे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदिप अहिरे बॅनर व लाईट, वंश अहिरे, दिग्विजय अहिरे, अक्षय अहिरे आदी सर्व तरुणांनी मेहनत घेतली. नवविवाहित अक्षता – नरेश तांबे यांच्या वतीने रात्री भोजन दान देण्यात आले.