तवसाळ-व्हाया कुडली बंदरवाडी ते अक्कलकोट एस.टी. सेवा १ जूनपासून सुरु – प्रायोगिक तत्वावर १० दिवसांची सुविधा
माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद चाचे यांची मागणी रंगत आणते; स्वामी भक्तांसाठी सुखद बातमी, चांगला प्रतिसाद मिळाल्यास सेवा कायमस्वरूपी सुरू होणार
गुहागर -श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी – गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांच्या पाठपुराव्याने तवसाळ (व्हाया कुडली बंदरवाडी) ते अक्कलकोट एस.टी. बस सेवा १ जून २०२५ पासून सुरू होणार आहे. ही सेवा प्रायोगिक तत्वावर १० दिवसांसाठी चालवण्यात येणार आहे.
या मार्गात तवसाळ, पडवे, सडेजाभारी, काताळे, कुडली बंदरवाडी, मासू, अबलोली, भातगाव, कोळवली, कोतळूक, शीर ही गावे समाविष्ट आहेत. या भागातील स्वामी समर्थ भक्तांसाठी अक्कलकोटपर्यंत थेट एस.टी. सेवा म्हणजे एक महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार आहे.
प्रारंभीच्या १० दिवसांत या बससेवेचा प्रवास भारमान चांगला राहिला, तर ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येईल. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बस सेवा रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी व प्रवाशांनी या सेवेला चांगला प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तवसाळ-अक्कलकोट एसटी सेवा १ जूनपासून तवसाळ, पडवे, सडेजाभारी, काताळे, कुडली बंदरवाडी, मासू, अबलोली, भातगाव, कोळवली, कोतळूक, शीर या गावांतील भक्तांना अक्कलकोटच्या दर्शनासाठी थेट बस सेवा उपलब्ध होणार आहे.
बस वेळापत्रक पुढीलप्रमाणे: तवसाळहून प्रस्थान: संध्याकाळी ७ वाजता |
आजपासून या बससाठी ऑनलाईन बुकिंग उपलब्ध करण्यात आले आहे.
सर्व स्वामी भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे, अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
हॅशटॅग्स:
#अक्कलकोटबससेवा #स्वामीसमर्थ #गुहागरएसटी #मिलिंदचाचे #तवसाळतेअक्कलकोट #KonkanNews #RatnagiriNews
फोटो