दिपक रतनराव शिंदे नावाचे वादळ अखेर थांबले…
???? सरकारी नोकरी सांभाळत गरीबांना न्याय देण्यासाठी धडपडणारा सच्चा कार्यकर्ता गेल्याचे दुःख
चिपळूण – (योगेश पेढांबकर वार्ताहर)
नेतृत्व पदाने नाही, सेवाभाव, सचोटी आणि विश्वासाने मिळतं – दीपकराव शिंदे हे त्याचं जिवंत उदाहरण आहेत.”
जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर
चिपळूण गावातील कोळकेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व चिपळूण तालुका माहिती अधिकार संघटनेचे सचिव *श्री. दीपक रतनराव शिंदे* एक प्रभावी समाजसेवा, सच्चाई आणि लोकांशी नातं टिकवण्याची कला – या गुणांमुळे दीपक रतनराव शिंदे यांना स्थानिक पातळीवर व तालुक्यातून तसेच जिल्हाभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत होता. सामाजिक क्षेत्राला वाहून घेणारा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केली होती
सामाजिक क्षेत्राला वाहून घेणार आहे. सामाजिक कार्यकर्ता गेल्याचे दुःख संपूर्ण तालुक्याला हेलावत आहे.
समाजसेवेचा दीर्घ प्रवास
दीपक रतनराव शिंदे गेली अनेक वर्षं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरकारी नोकरी करीत गोर – गरीबांना न्याय देण्यासाठी निस्वार्थ भावनेनं सामाजिक कार्य करत असत. ही त्यांची ख्याती होती.
अन्नदान, रुग्णवाहिका सेवा, शैक्षणिक मदत, आपत्तीप्रसंगी मदतीचा हात*– यांसारख्या विविध उपक्रमांमधून त्यांची सक्रियता जाणवते. त्यांचा कार्याचा रोख केवळ सरकारी नोकरीपुरता नव्हता, तर गोर- गरिबाना न्याय देण्यासाठी मर्यादित न राहता, सामान्य जनतेशी थेट जोडलेला होता.
नेतृत्वाचं प्रतीक – म्हणजे दीपक शिंदे*
एक स्थानिक नागरिक म्हणतो, “नेतृत्व हे पदाने नाही, तर कार्याने व कर्तृत्वाने सिद्ध होते. – आणि दिपक रतनराव शिंदे हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत” हे विधान केवळ भावनिक नाही, तर त्यांच्या कार्याच्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेली प्रतिक्रिया आहे.
चिपळूण तालुक्याला नव्हे तर संपूर्ण दसपटीला गावाला ,शहराला एक सजग, सुसंस्कृत आणि संवेदनशील नेतृत्व मिळू शकतं, नाही. धडाडीचे नेतृत्व कसा असावा कोणताही काम हातात घेतल्यानंतर ते परिपूर्ण कसे करावे. हे दीपक रावांच्या कामातून आपल्याला दिसून येत होतं.गेली अनेक वर्ष त्यांनी सरकारी काम करत असताना सरकारी नोकरी सांभाळत असताना प्रसंगी कुटुंब बाजूला ठेवून सामाजिक क्षेत्राला आपल्या वडिलांच्या वारसा घेत पुढे सामाजिक कार्य त्यांनी कायम चालू ठेवलं. हेच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे दिपकराव शिंदे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीम.दीपिका शिंदे ,त्यांचा गुणवंत मुलगा कु.क्षितिज शिंदे असे आहेत.