माजी आमदार आर. टी. देशमुख (जिजा) यांचे अपघाती निधन – राजकारणातील एक मनमिळावू चेहरा हरपला

भावपूर्ण श्रद्धांजली

 

माजी आमदार आर. टी. देशमुख (जिजा) यांचे अपघाती निधन – राजकारणातील एक मनमिळावू चेहरा हरपला

 

माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि गोरगरीब जनतेचे नेहमीसाठीचे आधारवड श्री. आर. टी. देशमुख (जिजा) यांचे आज अपघाती निधन झाल्याचे दुःखद वृत्त समोर आले आहे. अत्यंत मनमिळावू स्वभाव, सर्वसामान्यांच्या हितासाठी सतत झटणारे, आणि एक फोन केला की तत्परतेने मदतीला धावून जाणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

 

जिजा यांनी राजकारणात असताना सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणारा आणि समाजाच्या सर्व थरांशी जोडलेला नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मतदारसंघ, कुटुंबीय आणि सहकारी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

या अपूरणीय दुःखात आपण सर्व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत.

भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली!

 

#RTDeshmukh #माजीआमदार #माजलगाव #श्रद्धांजली #राजकीयक्षणभरथांबले #BeedNews #PoliticalLoss #RatnagiriVartahar

 

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें