जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये माहिती अधिकार अर्ज ई टपाल (आवक जावंक कक्ष)मध्ये नाकारले जात असल्याचा प्रकार – प्रशासनाची टाळाटाळ नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली

जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये माहिती अधिकार अर्ज ई टपाल (आवक जावंक कक्ष)मध्ये नाकारले जात असल्याचा प्रकार – प्रशासनाची टाळाटाळ नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली

 

रत्नागिरी (प्रतिनिधी): श्री निलेश रहाटे

जिल्हा परिषद कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या ई-टपाल कक्षात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार नागरिकांच्या घटनात्मक हक्कांची पायमल्ली करणारा आहे, असे स्पष्ट दिसून येते.

 

नागरिकांकडून वारंवार माहिती अधिकाराचे अर्ज देण्यासाठी प्रयत्न केले जात असताना, संबंधित कर्मचाऱ्यांनी असा निर्वाळा दिला की, “आमच्याकडे RTI अर्ज स्वीकारले जात नाहीत, तुम्ही तो थेट संबंधित विभागात जाऊन द्या आणि पोच घ्या.”

 

विशेष बाब म्हणजे, कर्मचाऱ्यांकडून असंही सांगण्यात आलं की, “आम्हाला सूचना आहेत की RTI व कुठच्या ही मिटिंगचे फॉर्म स्वीकारू नयेत.” परंतु, जेव्हा यासंदर्भात कोणत्या अधिकाऱ्यांकडून हे आदेश मिळाले आहेत, याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार निलेश रहाटे हयांनी ई टपाल कक्ष मध्ये विचारणा केल्या वर त्याचे उत्तर देण्याचे टाळण्यात आले आणि संवाद टाळण्याचा प्रयत्न झाला.

 

???? कायद्याचा भंग:

 

हा प्रकार माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 6(1) व 6(3) चा स्पष्ट भंग आहे अस स्पष्ट सांगतो.

 

या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, शासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. माहिती अधिकाराचा वापर करून जनतेने उत्तरदायित्व मागायला हवे, हे सरकार सांगते; पण प्रत्यक्षात शासकीय कार्यालयांमधूनच अडथळे निर्माण होतात, ही बाब दुर्दैवी आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें