सरकारला गंडा? महसूल खात्याने शिरसाट यांच्या मुलाला दोनशे कोटींचं वेदांत हॉटेल फक्त 64 कोटींना विकलं!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???????? सरकारला गंडा? महसूल खात्याने शिरसाट यांच्या मुलाला दोनशे कोटींचं वेदांत हॉटेल फक्त 64 कोटींना विकलं!

???? अंबादास दानवे आक्रमक, संजय राऊतांचा घणाघात; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर: राज्यात महायुती सरकार असताना त्याच सरकारच्या मंत्र्यांनीच शासकीय तिजोरीत खडखडाट करण्याचा सपाटा लावल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जवळपास 200 कोटींचं वेदांत हॉटेल महसूल विभागाने केवळ 64 कोटी 82 लाख रुपयांना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाला विकल्याची माहिती समोर आली आहे.

वेदांत हॉटेल रेल्वे स्थानक मार्गावर अतिमहत्त्वाच्या ठिकाणी असून, त्याचा आणि शेजारच्या भूखंडाचा लिलाव महसूल विभागाने ऑनलाइन पद्धतीने केला. लिलावात ‘सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लाय’ या कंपनीने हॉटेलसाठी 47.56 कोटी आणि लॉनसाठी 17.82 कोटी रुपयांची बोली लावली. ही कंपनी शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सदर मालमत्ता धनदा कॉर्पोरेशनकडून जप्त करण्यात आली होती, जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विक्रीस काढण्यात आली. सातव्यांदा लिलाव होत असतानाच ही बोली मंजूर करण्यात आली आणि हॉटेल शिरसाट यांच्याकडे गेलं.

संजय राऊत यांचा हल्लाबोल:

“शिरसाटांच्या मुलाकडे इतका पैसा आला कुठून? टेंडरिंगमधून, दलालीमधून की ५० खोक्यांमधून?” असा संतप्त सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर ताशेरे ओढले. “शहांनी आणि फडणवीसांनी महाराष्ट्र लुटीचा परवाना दिलाय का?” असा टोलाही त्यांनी लगावला.

दानवे यांची चौकशीची मागणी:

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या लिलावाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि अंतिम हस्तांतरण होण्यापूर्वी सर्व माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

#वेदांतहॉटेल #संजयशिरसाट #महसूलविभाग #भ्रष्टाचार #संजयराऊत #अंबादासदानवे #महाराष्ट्रराजकारण #मिंधेगट #मंत्र्यांचाघोटाळा #RatnagiriVartahar

???? फोटो

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम)  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई...
Read More
गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत महेश नाटेकर, निलेश सुर्वे व सुचिता घाणेकर यांना...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न   गोरेगाव येथील छोटा काश्मीर येथे ग्रामस्थांची...
Read More
हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Play sound