खांमगाव गौळवाडी येथे श्री. राधाकृष्ण मंदिर प्राण-प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

रायगड – संदीप शेमणकर
खांमगाव गौळवाडी खालची आळी तालुका म्हसळा जिल्हा रायगड येथे श्री. राधाकृष्ण मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला,अनेक वर्षाची प्रतीक्षा अखेर पूर्ण झाली.
मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी. दुपारी ग्रामदेवता श्री करजाई देवीच्या मंदिरातून गावापर्यंत खालूबाज्याच्या तालावर मोठ्या थाटामाटात लहान-थोर, महिला पुरुष यांनी आनंदात रंगून जाऊन मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी धान्यादिवास, जलादिवास, लक्ष्मीदिवास, शयनवास, पुष्पादिवास अश्या विविध प्रकारच्या पूजन करण्यात आले.
“आला सोहळा शुभ प्राणप्रतिष्ठेचा, राधाकृष्णाच्या मंगल रुपाचा!”
दि. १४ मे २०२५ रोजी सकाळी ध्वजपूजन, द्वारपाल पूजन, प्राथमिक पूजा विधी प्रारंभ करून रुद्राभिषेक, होम हवन, प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण,पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद, मान्यवरांचे स्वागत समारंभ, महिलांसाठी हळदीकुंकू,श्री स्वर भजन मंडळ अशा प्रकारे कार्यक्रम करण्यात आले.
सदर मंदिरासाठी जागा गायकर कुटुंबयांकडून दान करण्यात आली, खामगावचे दानशूर व्यक्तिमत्व श्री. संभाजी कांबळे यांच्या हस्ते रिबीन कापून मंदिराच उद्घाटन करण्यात आले, श्री. राधाकृष्ण व गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्री. ष. ब्र. प्र. १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (बेळंकी) यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
खामगांव गौळवाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ (खालची आळी), राधाकृष्ण युवा मित्र मंडळ (मुंबई कमिटी) यांनी स्वनिधी आणि देणगीदार यांच्या निधीतून वर्षभरात श्री राधाकृष्ण मंदिर उभारण्यात आले.
यासाठी खामगांव गौळवाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ (खालची आळी) व श्री. राधाकृष्ण मंदिर कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, उपाध्यक्ष पांडुरंग गायकर, सचिव आदर्श कांबळे, उपसचिव आश्वेश कांबळे, खजिनदार गणेश महाडीक, उप खजिनदार रोशन कांबळे,
कार्याध्यक्ष महेंद्र गायकर, उप कार्याध्यक्ष मनोज गायकर, हिशोब तपासनीस सुभाष लटके, सल्लागार अशोक कांबळे, संभाजी कांबळे, प्रदीप कांबळे, सुरेश बिरवाडकर, शंकर बिरवाडकर, श्याम कांबळे, रुपेश गायकर, सदस्य राम लाड, राम कांबळे, सुनिल गायकर, प्रशांत गायकर, मितेश गायकर, बबलु लटके महिला मंडळ अध्यक्षा यांनी संपूर्ण दोन दिवस कार्यक्रमात सक्रिय भाग घेऊन मंदिर बांधण्याच्या प्रस्तावापासून ते मंदिर पूर्ण होईपर्यंत खूप मेहनत घेतली.