पाचेरीसडा नं. १ शाळेत स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांकडून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

पाचेरीसडा नं. १ शाळेत स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांकडून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप..!

.स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..!
आबलोली (संदेश कदम) – गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पाचेरीसडा नं. १ या शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शाळेतील ध्वजारोहण करुन विद्यार्थ्यांनी निर्मल ग्रामपंचायत पाचेरीसडा याठिकाणी प्रभातफेरी काढली यावेळी शाळेमध्ये विद्यार्थी मनोगत, निपुण प्रतिज्ञा, बालसभा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून “मिशन आपुलकी” अंतर्गत गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी शाळेला शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करून शाळेच्या प्रगतीसाठी एक हात पुढे करून योगदान दिले . हे योगदान मिळण्यासाठी श्री.संजय वाघ यांनी विशेष प्रयत्न केले. यामध्ये ज्ञानदीप सेवा मंडळ बौद्धवाडी या मंडळा कडून १० चटई शाळेला भेट म्हणून देण्यात आल्या तर जय जांगलदेव विकास मंडळ पंड्येवाडी या मंडळा कडून शाळेला दोन फॅन सेट आणि ४ कागद रिम भेट म्हणून देण्यात आले तसेच श्री. जगदीश यादव यांचेकडून तीन बॅट, दोन स्टम्प जोडी, एक बॉक्स बॉल, १५ नग दोरी उड्या रशा, बॅडमिंटन २ जोडी, टेबल टेनिस १ जोडी असे एकुण १०,०००/- रुपये किमतीचे क्रिडा साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी खाऊ देण्यात आला तर श्री. महेंद्र यादव यांच्या कडून शाळेसाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला आणि श्री. सुनील यादव यांच्या कडून शाळेला दोन घड्याळे भेट देण्यात आली तसेच शाळा व्यवस्थापन समिती पाचेरीसडा नं. १ मार्फत या सर्व देणगी दारांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिल भाऊ जोशी यांनी भूषविले या कार्यक्रमाला माजी सरपंच संतोष आंब्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. प्राजक्ताताई डिंगणकर, उपाध्यक्ष श्री. अनिल जोशी, तंटामुक्ती समीती अध्यक्ष श्री. शशिकांत यादव, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजन खरे, श्री. धर्मानंद यादव, श्री. जगदीश यादव, वर्षाताई डिंगणकर, रेणुका वेलोंडे, आप्पा मालप यांचेसह ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थितीत होते. शाळेच्या शैक्षणिक प्रगती बद्दल श्री. संतोष आंब्रे, श्री. धर्मानंद यादव यांनी आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय वाघसर, श्री. लबडे सर, रुईकर मॅडम, मुळेसर यांनी विशेष प्रयत्न केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक श्री. लबडे यांनी केले शेवटी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि ग्रामस्थांना शाळा व्यवस्थापन समिती पाचेरीसडा नं. १ यांचेकडून मिठाई देण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोप करताना उपस्थितीत सर्वांनी “निपुण प्रतिज्ञा” घेतली शेवटी मुख्याध्यापक श्री. संजय वाघ यांनी सर्व देणगीदारांचे, ग्रामस्थांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें