???? रत्नागिरीचा अविराज गावडे गाजवतोय इंग्लंडचे मैदान!
कौंटी स्पर्धेत दुसऱ्यांदा मिळवला ‘सामनावीर’चा मान; अष्टपैलू खेळाने मिळवला मिडलसेक्सचा विजय
रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेत मिडलसेक्स संघाकडून खेळत असून, त्याच्या दमदार अष्टपैलू खेळीमुळे इंग्लंडमध्येही त्याचं नाव चांगलंच गाजत आहे. अलीकडेच हर्लिंग्टन मिडोज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अविराजने ५३ चेंडूंमध्ये १४ चौकारांच्या मदतीने झंझावाती ७० धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेले. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही त्याने आपला ठसा उमटवत ९ षटकांत २ बळी घेतले. इतकंच नाही, तर क्षेत्ररक्षणातही त्याने दोन अप्रतिम झेल पकडले आणि दोन फलंदाजांना थेट थ्रोवर बाद करत सामना फिरवून टाकला.
या सर्वांगिण कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, याआधीही एका सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे इंग्लंडच्या मैदानात रत्नागिरीचा झेंडा अविराज गावडे अभिमानाने फडकवत आहे.
—
????️ हॅशटॅग्स:
#AvirajGawade #RatnagiriCricket #CountyCricket #MiddlesexCricket #ManOfTheMatch #MarathiCricketer #EnglandMadheKonkanchaMulga
—
???? फोटो