गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा (मोंभार) येथे १० सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन..!

गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा (मोंभार) येथे १० सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन..!

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संत निरंकारी मिशन(रजि.) दिल्ली, शाखा गुहागर यांचा स्तुत्य उपक्रम..!

आबलोली (संदेश कदम) ……

गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा (मोंभार) येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संत निरंकारी मिशन (रजि.) दिल्ली, शाखा गुहागर यांचे संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन,मु.पो.पाचेरीसडा (मोंभार) येथे मंगळवार दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात गुहागर तालुक्यातील आणि पाचेरीसडा (मोंभार) पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा असे जाहीर आवाहन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संत निरंकारी मिशन(रजि.) दिल्ली, शाखा तालुका गुहागर यांचे वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे . 

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे सन १९८६ मध्ये करण्यात आले होते त्यावेळी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला की “रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे. आध्यात्मिक जनजागृती बरोबर सामाजिक बांधिलकी तत्परतेने जोपासण्याचे महान कार्य संपूर्ण वैश्विक स्तरावर आज ही, सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपा छत्र छायेखाली निरंतर सुरू आहे.

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबिर तसेच महिला सशक्तीकरण, बाल – विकास तसेच नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य इत्यादी समाज उपयोगी कार्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून अविरतपणे सुरू आहेत.याचाच एक भाग म्हणून गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा (मोंभार) येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे मंगळवार दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें