सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केळस्कर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केळस्कर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

.तळवली (मंगेश जाधव)

तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केलस्कर व योगेश केळस्कर व कुटूंबायाकडून तळवली भडकंबा येथील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आपले वडील गवळी समाज भूषण शंकर गोपाळ केळस्कर यांच्या 76 व्या वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्याच वाटप करण्यात आले

. गेल्या वर्षी प्रशांत केळस्कर यांनी आपल्या वडिलांचा 75 वा वाढदिवस साजरा केला होता त्यावेळी गुहागर तालुक्याचे आमदार भास्कर शेठ जाधव त्याच बरोबर चिपळूण तालुक्याचे आमदार शेखर निकम सर यांनी कार्यक्रमाला येऊन शुभेच्छा दिल्या होत्या

. यावर्षी केलस्कर यांनी गावातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे प्रशांत केलस्कर व योगेश केळस्कर हे समाजिक क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर असतात आपल्या गावात वाडीत विद्यार्थी व ग्रामस्थांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून अनेक विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले

. प्रशांत केळस्कर यांनी बोलताना संगितले कि पुढल्या वर्षी इयत्ता 10 वी व 12 वी च्या वर्गात वाडीमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला रोख रक्कम व शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे आश्वासन दिले

. श्रावणी कळंबाटे हिने आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप केलेल्या कामामुळे कृतज्ञता व्यक्त केली व या अश्या उपक्रमामुळे आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल व आम्ही शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश संपादन करू असं आश्वास दिले व त्यांना शुभेच्छा हिं दिल्या

. या कार्यक्रमासाठी सामाजिक सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केळस्कर, योगेश केळस्कर,प्रवीण केळस्कर सर ,बाळकृष्ण कांबळे, प्रा.अमोल जड्याळ, अनंत कळंबाटे, प्रकाश जड्याळ, लवू कळंबाटे, दीपक कळंबाटे, रवींद्र केलस्कर, अशोक केलस्कर, प्रकाश केलस्कर, रुपेश महाडिक, रमेश तांबडे, संतोष केलस्कर, अक्षय कासार, शिक्षिका सौ.प्रेरणा केलस्कर इ उपस्तिथ होते

. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रा.अमोल जड्याळ सर यांनी केले व सौ प्रेरणा केलस्कर यांनी सांगितले कि आपली ज़िल्हा परिषद चि मुलं मंथन व स्कॉलरशिप इस्रो सारख्या ठिकाणी निवड होते तसाच प्रयत्न तुम्ही हिं करा असं आव्हाहन विद्यार्थ्यांना केले व आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें