उल्हास ट्रस्टतर्फे पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरित..! उल्हास ट्रस्टचा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उल्हास ट्रस्टतर्फे पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरित..!
उल्हास ट्रस्टचा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम..!

आबलोली (संदेश कदम)…
उल्हास ट्रस्टतर्फे होतकरू , हुशार , अनेक स्पर्धा व कार्यक्रम – उपक्रमांमध्ये सहभागी असणारे विद्यार्थी तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असणारे विद्यार्थी अशा निकषांनुसार विद्यार्थ्यांची निवड करून त्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. उल्हास ट्रस्टतर्फे गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील हुशार , अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी असणारे तसेच विविध शालेय कार्यक्रम – उपक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या नववी व दहावीमधील दहा विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचा शिष्यवृत्ती धनादेश तसेच शैक्षणिक वस्तू वितरित सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.
उल्हास ट्रस्टतर्फे प्रदान होणाऱ्या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमासाठी उल्हास ट्रस्टचे प्रफुल्ल चव्हाण , वेदिका चव्हाण , स्नेहा काटकर , पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील व शिक्षकवृंद उपस्थित होते. मानसी संदीप पालकर , मृण्मयी दत्ताराम जाधव , प्रज्ञा प्रमोद पवार , रचना रमेश खांबे , सई लक्ष्‍मण बारे – इयत्ता नववी तसेच श्रेयशा सहदेव नरळे , श्रेया अजय पावसकर , रिया मंगेश धामणस्कर , आदित्य विलास मते , रोशन दिलीप मते या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते एक हजार रुपयांचा धनादेश व शैक्षणिक वस्तू प्रदान करण्यात आली.उल्हास ट्रस्टचे प्रफुल्ल चव्हाण यांनी पाटपन्हाळे विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा हेतू सांगितला . उल्हास ट्रस्टचे पाटपन्हाळे विद्यालयाला सहकार्य लाभल्याबद्दल व सदर ट्रस्टचा सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबविल्यामुळे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी धन्यवाद मानले .

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई

■ ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई ■ २७ मार्च ला दाखल केला होता चौकशी अहवाल ■...
Read More
ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई

देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

“देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय” लांजा- (जितेंद्र चव्हाण).राजापूर तालुक्याच्या विकासासाठी...
Read More
देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More
पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार नाशिक (गुरुदत्त वाकदेकर): कलावंत विचार मंच,...
Read More
नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६-  कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय 'ब्लॅक बेल्ट' परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या यशाने लांजाचा नावलौकिक; ७...
Read More
लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

■ राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश ■ अध्याप चौकशी न...
Read More
राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे...
Read More
टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): राजीव गांधी आंतरराष्ट्रीय...
Read More
पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

*पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ *२६वे कविसंमेलन दादरमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा