कोकणात मुसळधार पाऊस असल्याने शाळा उशिराने सुरु करा – पराग कांबळे यांची आग्रही मागणी
आबलोली (संदेश कदम)
१६ जून २०२५ पासून नविन वर्षाचे शालेय सत्र सुरु होत आहे मात्र येत्या ५ दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने सरकारने शाळा सुरु करु नयेत. शाळा पुढील आठवड्यात सुरु कराव्यात अशी आग्रही मागणी बळीराज सेना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी सरकारकडे केली आहे. सुट्टी संपून १६ जून २०२५ पासून शाळा सुरु होत आहेत मात्र कोकणात व राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे कोणताही धोकादायक प्रकार घडू नये यासाठी सरकारने उशिराने शाळा सुरु कराव्यात अशी आग्रही मागणी सरकारकडे बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी केली आहे