???? छानशा ट्रॅक्टर मिरवणुकीतून पहिलीतील विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश!
पुरी जिल्हा परिषद शाळेत उत्साहात नवागत स्वागत; औक्षण, गुलाब, जिलेबीने सजले प्रवेशद्वार
संभाजीनगर (प्रतिनिधी) – तालुका गंगापुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरी येथे इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. खास सजविलेल्या ट्रॅक्टरद्वारे विद्यार्थ्यांची आकर्षक प्रवेशदिंडी काढण्यात आली. मुखवटे घालून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गावात रंगत निर्माण केली.
प्रवेशदिंडीनंतर फुलांनी सजविलेल्या प्रवेशद्वारातून नवागतांचे आगमन झाले. गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. वंदना ताई राऊत यांनी स्वतः विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेतील कुंकवाच्या ठशाने ‘पहिलं पाऊल’ घेण्यात आलं, तर प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबाचं फूल आणि पुस्तक भेट देण्यात आलं. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करून गोड आठवणी देण्यात आल्या.
या सोहळ्याला सौ. वंदना ताई राऊत, त्यांचे पती श्री. अविनाश राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नवनाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. रामदास मोरे व योगेश मोरे, शिक्षणतज्ञ श्री. राजूभाऊ तिवारी, ट्रॅक्टर पुरवणारे अशोक मोरे, शाळा व्यवस्थापन सदस्य श्री. आप्पासाहेब मोरे यांची उपस्थिती लाभली होती.
मुख्याध्यापक श्री. शिवाजी मोरे व शिक्षक वृंद यांनी हा सोहळा सहकार्याने व आनंदात यशस्वी केला.
—
????️ #प्रवेशोत्सव #शाळा #पुरी #शैक्षणिकउत्सव #विद्यार्थीस्वागत #ZPschool #RatnagiriNews
???? फोटो