वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

 

गुहागर (सुजित सुर्वे वार्ताहर)तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी वेलदूर ग्रामपंचायतीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ शंकर कोळथरकर, नवानगर गावचे ग्रामस्थ संजय फुण गुसकर, अंगणवाडी मदतनीस गीता वरवटकर, महिला मंडळ सदस्या चैताली जांभारकर, मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील, शाळेतील शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे,सुषमा गायकवाड,अफसाना मुल्ला,पालक, ग्रामस्थ,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्रात सर्व ग्रामस्थ, पालक,विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षणतज्ञ शंकर कोळथरकर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी केले. मुलांना योगासनाचे फायदे सांगितले. योगासने,प्राणायाम आणि ध्यानधारणा या गोष्टी आरोग्य उत्तम राखायला उपयोगी पडतात असे त्यांनी सांगितले . आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी माहिती धन्वंतरी मोरे यांनी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसाना मुल्ला मॅडम आणि आभार प्रदर्शन सुषमा गायकवाड यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ पत्रकार - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

Leave a Comment

आणखी वाचा...