भाजपच्या सरचिटणीसांची प्रशासनाला खडे बोल ! जिल्हाधिकाऱ्याच्या प्रशासनाकडून पत्रांना उत्तरे नाहीत?”

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

????”भाजपच्या सरचिटणीसांची प्रशासनाला खडे बोल ! जिल्हाधिकाऱ्याच्या प्रशासनाकडून पत्रांना उत्तरे नाहीत?”

????डॉ. विनय नातू यांचा गंभीर सवाल : जनतेलाही न्याय मिळेल का? जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुर्लक्षाचा आरोप

???? रत्नागिरी:: (वार्ताहर)

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासन नियमबाह्य वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या विविध पत्रांना अद्याप उत्तरे न मिळाल्यामुळे ते हतबल झाले असून, “जेव्हा आमच्याच पत्रांची दखल घेतली जात नाही, तर सामान्य जनतेच्या न्यायाची काय खात्री?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. नातूंनी स्पष्ट केले की, त्यांनी वेळोवेळी SOP (कार्यपद्धती) नुसार पत्रे दिली असूनही, कोणतीही कारवाई किंवा लेखी उत्तर मिळालेले नाही. विशेष म्हणजे, जिल्हा पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात दिलेल्या पत्रांचीही दखल घेतलेली नाही, असा त्यांचा अनुभव आहे.

    ⭕ आ. नातू यांची press  ???? Youtube ▶️ VDO ???? क्लिक  करा

 

तसेच, जिल्हा माहिती अधिकारी शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत स्वतःचे निकष लावतात, असा आरोप करत त्यांनी सांगितले की त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अनेक जनहिताच्या योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही.

“सकारात्मक योजना असूनही प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे जनतेत नाराजी पसरते आहे. ही नाराजी गावपातळीवर निवडणुकीत भाजपला फटका देऊ शकते,” असा इशाराही डॉ. विनय नातूंनी दिला.

???? एकंदरीत, भाजपने उपस्थित केलेले प्रश्न केवळ पक्षीय नाहीत, तर प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर बोट ठेवणारे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ याची दखल घेणे आवश्यक आहे.

???? हॅशटॅग्स

 

#रत्नागिरी #भाजप #विनयनातू #जिल्हाधिकारीप्रशासन #पत्रव्यवस्था #SOP #जनतेच्याअडचणी #शासननिष्काळजीपणा #RatnagiriNews #BJPKonkan

 

 

 

????️ फोटो

 

✍️ बातमी : रत्नागिरी वार्ताहर

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ पत्रकार - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

Leave a Comment

आणखी वाचा...