????
जि.प.प्रा.शा. पुरी येथे योगदिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतला योगाभ्यासाचा अनुभव
दारकुंडे सर व सारसर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने; निरोगी जीवनासाठी नियमित योगा करण्याचे आवाहन
पुरी (ता. गुहागर) | नंदकुमार बागडेपाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरी येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या योग सत्रात सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमात योग एक्स्पर्ट श्री. दारकुंडे सर आणि क्रिडा शिक्षक श्री. सारसर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मासन, वज्रासन, पश्चिमोत्तानासन, अर्धमच्छेंद्रासन, हलासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, धनुरासन, ताडासन, वृक्षासन यांसारखी विविध योगासने करण्यात आली.

यानंतर मुख्याध्यापक मा. मोरे सर व मा. श्री. शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नियमित योगाचे आरोग्यावर होणारे फायदे अधोरेखित केले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, तणाव दूर होतो आणि मनःशांती मिळते, असे त्यांनी सांगितले.
????
योगाचे आरोग्यदायी फायदे:
- शारीरिक आरोग्य: शरीर मजबूत व निरोगी ठेवतो
- मानसिक शांती: तणाव कमी करतो, एकाग्रता वाढवतो
- लवचिकता: शरीर लवचिक बनवतो
- रोगप्रतिकारशक्ती: प्रतिकारशक्ती वाढवतो
- ध्यान: मानसिक शांती व आत्मसंतुलन मिळते
????
????️ हॅशटॅग्स
#योगदिन2025 #जिपप्राशाळापुरी #InternationalYogaDay #योगासाठीएकत्र #गुहागरशाळा #StudentYoga #योगसंपन्नशाळा