???? : हिंदी तिसरी भाषा म्हणून लादण्यास मनसेचा ठाम विरोध; मराठी अस्मितेसाठी निर्णायक लढा
दापोली (वार्ताहर)) तालुक्यातील येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मराठी जनतेवर हिंदी तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या प्रयत्नांना कडाडून विरोध दर्शवला आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण हे पक्षाचे प्राधान्य असून, मराठीतून शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र वितरणाची मोहीम आज दापोलीत सुरू करण्यात आली.
या मोहिमेचा शुभारंभ माजी जिल्हाध्यक्ष संतोष शिर्के यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्याचबरोबर, दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, शुभम शिंदे, अरविंद पुसाळकर, नदिम पठाण, मयुरेश वेल्हाळ आणि अन्य कार्यकर्त्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार करत, मराठीतून शिक्षणास चालना देण्यासाठी ही पत्रे वितरित केली जात आहेत. मनसेने यापूर्वीही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध आंदोलने केली असून, आता ही मोहीम राज्यातील प्रत्येक तालुक्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाने मराठी जनतेला एकजुटीने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करून, मराठी अस्मितेच्या जतनासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.
—
#MNS #RajThackeray #MarathiAsmita #DapoliNews #Konkan #मराठीअस्मिता #MaharashtraNavnirmanSena #MarathiLanguage #Education #मराठीसंस्कृती #HindiLanguageOpposition #मनसे #मराठीभाषा #MaharashtraNews #RatnagiriNews