ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना शिंदे सरकारचा मदतीचा हात!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘बेघर होऊ देणार नाही’ असे आश्वासन; सुशांत शेलारच्या प्रयत्नांना यश
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी आपल्या संघर्षाबद्दल सांगितले होते, ज्यात त्यांना आता सिनेमात काम मिळत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावल्याचे स्पष्ट झाले होते. या त्रासाला कंटाळून माहिमकरांनी राज्यपालांकडे इच्छामरणासाठी अर्ज केल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. अशा कठीण परिस्थितीत, अभिनेता सुशांत शेलार त्यांच्या मदतीला धावून आला आहे.
सुशांत शेलारने पुढाकार घेत मनमोहन माहिमकर यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घडवून आणली. या भेटीदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिमकर यांना ‘तुम्हाला बेघर होऊ देणार नाही’ असे भावनिक आणि महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनामुळे माहिमकर यांना मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या पुढील जीवनासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.
या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आणि सामाजिक वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे. कलाकारांच्या उतारवयातील आर्थिक सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#ManmohanMahimkar #EknathShinde #SushantShelar #MarathiActor #मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी #कलाकार #मराठीसिनेमा #संघर्ष #Home #Shivsena #RajshriMarathi #MumbaiNews #कलाकारां
नामदत
















