ST बस ठरली विठुराया आणि भाविकांमधील दुवा: ९.७१ लाखांहून अधिक भाविकांनी केला पंढरीचा प्रवास

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ST बस ठरली विठुराया आणि भाविकांमधील दुवा: ९.७१ लाखांहून अधिक भाविकांनी केला पंढरीचा प्रवास

#AshadiWari #STBus #Pandharpur #PratapSarnaik

पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यादरम्यान (Ashadi Wari) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) ९ लाख ७१ हजारांहून अधिक भाविकांना पंढरपूरपर्यंत (Pandharpur) सुखरूप पोहोचवले. यामुळे एसटी बस (ST Bus) ही विठुराया आणि भाविकांमधील महत्त्वाचा दुवा ठरली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

वारीसाठी एसटी महामंडळाने ५ हजार २०० जादा बस फेऱ्या (Extra bus services) चालवल्या. ३ ते १० जुलै दरम्यान या बसेसनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून ९ लाख ७१ हजार ६८३ भाविकांना ने-आण केली. या सेवेतून एसटीला तब्बल ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मागील वर्षीच्या (२०२४) आषाढी यात्रेतील उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त आहे.

मंत्री सरनाईक यांनी या यशस्वी सेवेबद्दल एसटी महामंडळाचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे लाखो भाविकांना सुखरूप विठ्ठल दर्शन घेता आले.

याशिवाय, आषाढी वारीच्या काळात पंढरपूरमध्ये आलेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणाअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ५, ६ आणि ७ जुलै रोजी स्वखर्चातून मोफत जेवण, चहा आणि नाश्त्याची सोय केली होती. हजारो कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घे

तला.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...