तवसाळ शाळा न १ ची विद्यार्थिनी कुमारी शुभ्रा सुर्वे हिचे नवोदय आणि शिष्यवृत्तीत दुहेरी यश!
गुहागर ( बातमी~संदेश कदम ) तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ ची विद्यार्थिनी कुमारी शुभ्रा निलेश सुर्वे हिने शैक्षणिक क्षेत्रात दुहेरी धमाका केला आहे. तिची राजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून, नवोदय प्रवेश परीक्षेत तिने गुहागर तालुक्यातून ९२% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच, नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालांमध्येही शुभ्राने गुहागर तालुका ग्रामीण विभागातून ७२% गुणांसह पुन्हा प्रथम क्रमांक पटकावून आपले नैपुण्य सिद्ध केले आहे.
सर्वांगीण शैक्षणिक कौशल्याची चुणूक
इयत्ता पहिलीपासूनच शुभ्राने आपल्या सर्वांगीण शैक्षणिक कौशल्याची चुणूक दाखवली आहे. शालेय, केंद्र आणि बीट स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. विशेषतः, वक्तृत्व कलेत तिचे विशेष नैपुण्य आहे. तिच्या या यशात जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे मुख्याध्यापक श्री. संदीप खंडगावकर आणि सहशिक्षक श्री. रविंद्र राठोड यांचे मोलाचे योगदान आहे.
“कल्पवृक्ष” सुर्वे परिवाराची गौरवशाली परंपरा
तवसाळच्या “कल्पवृक्ष” म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुर्वे परिवारातील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवणारी शुभ्रा ही पाचवी विद्यार्थिनी आहे. यापूर्वी श्री. रोहन प्रमोद सुर्वे, सौ. ऋतुजा रोहन सुर्वे, कु. मृण्मयी जयंत सुर्वे आणि कु. सार्थक सचिन सुर्वे यांनी नवोदय विद्यालयातून आपले शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे. शुभ्रा ही उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे नेते श्री. निलेश विश्वनाथ सुर्वे आणि काताळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. प्रियांका निलेश सुर्वे यांची कन्या आहे.
अभिनंदनाचा वर्षाव आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
शुभ्राच्या या यशस्वी वाटचालीसाठी तवसाळ पंचक्रोशीतील खोत मोहनबंधू गडदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. जगदीश गडदे, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री. विज्ञान सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. सत्यवान गडदे, ग्रामपंचायत उपसरपंच श्री. प्रसाद सुर्वे, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया सुर्वे यांच्यासह राजेश सुर्वे, प्रदीप सुर्वे, श्याम गडदे, विजय शिवकर, उदय शिरधनकर, मनीषा मयेकर, प्रीतम सुर्वे, किरण गडदे, मोहिनी सुर्वे, मनस्वी सुर्वे, अभिसलाम वाडकर, हर्षदा गडदे आणि केंद्रप्रमुख चिपळूणकर सर यांनी तिचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
#शुभ्रासुर्वे #नवोदयविद्यालय #शिष्यवृत्ती #तवसाळशाळा #गुहागरतालुका #शैक्षणिकयश #कल्पवृक्षसुर्वेपरिवार #रत्नागिरी
#शिक्षण