ब्रेकिंग: ‘चड्डी बनियन गँग’ विरोधात विरोधकांचं टॉवेल-बनियान आंदोलन; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी!
मुंबई: आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘चड्डी बनियन गँग हाय हाय’ च्या घोषणा देत आणि टॉवेल-बनियान घालून अनोखे आंदोलन केले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये कर्मचाऱ्याला चड्डी-बनियानवर मारहाण केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महेश सावंत आणि इतर अनेक महाविकास आघाडीच्या आमदारांनी सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी ‘चड्डी बनियन गँगचा धिक्कार’ असे फलकही झळकावले, ज्यावर संजय गायकवाड बॉक्सिंग पंच मारतानाचा फोटो होता आणि ‘चड्डी बनियन गँग’ असे प्रिंट केलेले बनियन परिधान केले होते.
विधानभवन परिसरात या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
#MaharashtraPolitics #VidhanBhavan #MVAProtest #ChaddiBaniyanGang #JitendraAwhad #AmbadadasDanve #SanjayGaikwad #BreakingNewsMaharashtra #राजकारण #महाराष्ट्र #विधानमंडळ #आं
दोलन