पाचेरी सडा येथे वादळी पावसाने डिंगणकर कुटुंबाचे मोठे नुकसान: मदतीची हाक!
गुहागर – (संदेश कदम, अबलोली)
वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा, पारेवाडी येथील राजेश शंकर डिंगणकर यांच्या घरावर भलेमोठे झाड कोसळले आहे. या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, डिंगणकर कुटुंबाला सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
ग्रामसेवक विश्वनाथ पावरा, तलाठी ए. बी. बरकडे आणि पोलीस पाटील शंकर डिंगणकर यांनी तात्काळ पंचनामा केला असून, यात अंदाजे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी गाव मंडळाचे अध्यक्ष संतोष डिंगणकर, उपाध्यक्ष दामोदर डिंगणकर, माजी सरपंच संतोष आंब्रे, सागर डिंगणकर आदी उपस्थित होते.
शासकीय मदत मिळण्यास वेळ लागणार असल्याने, सध्या या गरजू कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करून राजेश डिंगणकर यांना या कठीण प्रसंगातून सावरण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे
सहृदय आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या संकटातून सावरण्यास डिंगणकर कुटूंबियांना मदतीचा हात द्यावा, अशी ‘रत्नागिरी वार्ताहर’ कडून कळकळीची विनंती करण्यात येत आहे.
🙏 आपली छोटीशी मदत त्यांच्या आयुष्यात मोठा आधार ठरू शकते.🙏
—
#PacheriSada #Gujagar #RainDamage #FinancialAid #HelpNeeded #राजेशडिंगणकर #आर्थिकमदत #वादळीपाऊस #नुकसान #मदत
कारा