■ अखेर जैतापूर शाळा न.१ ला शिक्षक मिळाला
■ सरपंच राजप्रासाद राऊत,सदस्य सिकंदर करगुटकर,व रूपेश करगुटकर यांच्या पाठपुराव्याला यश
■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर 🙁 जैतापूर) – तालुक्यातील जैतापूर शाळा न.१ मध्ये पटसंख्या असुनही, कित्येक दिवस शिक्षक नव्हता, पालक, ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी मुलांना शाळेत न पाठविण्याचा पवित्रा घेतला होता, या गंभीर विषयाची दखल घेत गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ शिक्षक दिला होता,परंतु काही दिवसांनीं हाच प्रकार सुरू झाला होता.
सदर विषयीं जैतापूर गावचे रहिवासी, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर करगुटकर आणि त्यांचे सहकारी यांनी याबाबतची व्यथा आपल्या वरिष्ठांना सांगून गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन त्यांनी दि.५ जुलै २५ पासून शिक्षक श्री. मंगेश मतले यांची जैतापूर शाळा न.१ मध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यांबाबत परिसराततुन पाठपुरावा केल्याबद्दल आणि शिक्षक मिळवुन दिल्याबद्दल सरपंच राजप्रासाद राऊत, सदस्य सिकंदर करगुटकर, रूपेश करगुटकर, आणि जब्बार काझी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.