लांजात वाघाचा धुमाकूळ: पन्हळे दुडयेवाडीत दोन पाड्या फस्त, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लांजात वाघाचा धुमाकूळ: पन्हळे दुडयेवाडीत दोन पाड्या फस्त, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लांजा प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण)
लांजा तालुक्यात वाघाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज रात्रीच्या सुमारास पन्हळे दुडयेवाडी येथे एका वाघाने गोठ्यात शिरून दोन पाड्या फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पन्हळे दुडयेवाडी येथील शेतकरी मोसिन काळशेकर यांच्या गोठ्यात रात्री वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन पाड्या वाघाने मारून फस्त केल्या. यामुळे काळशेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती तातडीने लांजा वन विभागाला देण्यात आली आहे. शेतकरी मोसिन काळशेकर यांनी लांजा वनपाल सारिक फकीर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
या घटनेमुळे परिसरात वाघाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून वाघाला पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

 

 

#La_PanhaleDudhewadi #TigerAttack #LanjaNews #MaharashtraNews #ForestDepartment #FarmersLoss #WildlifeInvasion #BigCatAttack #रत्नागिरी #वन्यजीव #शेतकरी #वाघ #लांजा

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें