शिवसैनिकांचा उत्साह पाहून आ. भास्कर जाधव भारावले, कार्यकर्त्यांना दिले अनोखे गिफ्ट.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसैनिकांचा उत्साह पाहून आ. भास्कर जाधव भारावले, कार्यकर्त्यांना दिले अनोखे गिफ्ट.

आमदार भास्कर जाधव यांचा वाढदिवस ठरला शिवसैनिकांसाठी खास!

तवसाळ गावातील मुस्लिम मोहल्ला रस्त्यासाठी निधी जाहीर

गुहागर (सुजित सुर्वे ) – गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना खास कायम समर्थनाची भेट दिली. कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा केक कापून आनंद साजरा केला, तर आमदारांनीही त्यांना एक अनोखी भेट देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. अनोपचारिक गप्पा मध्ये पडवे जिप गटातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून, तवसाळ गावातील मुस्लिम मोहल्ला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

आमदार जाधव नुकतेच गुहागर दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या वेळी कार्यकर्त्यांमध्ये नेहमीप्रमाणे उत्साह आणि जल्लोष दिसून आला. शेकडो कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले होते.  श्रूगा तळी येथील पदाधिकारी राज विखारे यांनी आणलेल्या केक कापून  साहेबांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी पडवे आणि वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून काही माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद कशी वाढवायची, नवे मतदार कसे जोडायचे, त्यांना आपलेसे कसे करायचे आणि नवीन सभासद कसे बनवायचे, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्याचा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

या वेळी पडवे जिल्हा परिषद गटातील तवसाळ गावातील जगदीश गडदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण शिवसैनिक उपस्थित होते. त्यांचा उत्साह पाहून भास्कर जाधव भारावून गेले. ‘इतके कडवट शिवसैनिक मी आज पाहिले,’ असे ते म्हणाले. या कार्यकर्त्यांनी जाधव यांना पाठिंबा देत ‘आम्ही प्रत्येक निवडणुकीत जोमाने काम करू, तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या,’ असे सांगितले. यावर लगेचच जाधव यांनी तवसाळ येथील मुस्लिम मोहल्ला रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ‘तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी असेच प्रयत्न करा, माझे सहकार्य नेहमीच तुमच्यासोबत राहील,’ असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला विक्रांत जाधव, विनायक मुळे, तालुका प्रमुख सचिन बाईत, सचिव विलास गुरव, रवींद्र आंबेकर, काशिनाथ मोहिते, माजी सभापती पूर्वी निमूणकर, वनिता डिंगणकर,  पूजा कारेकर, प्रवीण ओक, संतोष तांदळे, सचिन जाधव, संतोष गडदे, सुजेंद्र सुर्वे, परेश गडदे, शरद सुर्वे, किरण सुर्वे, जयेश गडदे, उमेश महाकाळ, कमिल तावसळकर, तेजस शिवलकर यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◀️ VDO साठी येथे क्लिक करा 🔗👈📸

 

Hashtags:

* English Title: MLA Bhaskar Jadhav’s Birthday Gift to Shiv Sainiks: Funds for Tavsal Muslim Mohalla Road.

Hashtags:

#BhaskarJadhav #ShivsenaUBT #Guhagar #Tavsal #Ratnagiri #Politics #विकासकाम #भास्करजाधव #शिवसेना #गुहागर #रत्नागिरी #राजकारण #तवसाळ #BirthdayGift

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...