🌸 रक्षाबंधन उत्सवात ‘हरित राखी’चा संदेश – साटवली शाळेत अनोखा उपक्रम
राखीने नाती जोडली, वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही स्वीकारली
लांजा प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण) – जि.प. केंद्र शाळा साटवली मराठी शाळेत रक्षाबंधनाचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील 30 मुलांना मुलींनी पवित्र राखी बांधून बंधुत्वाचा सण आनंदात साजरा केला. यामध्ये अंगणवाडीतल्या लहान मुलांनाही सहभागी करून आनंद द्विगुणित झाला.
या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळेच्या परिसरातील वृक्षांनाही राख्या बांधण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत “वृक्ष तुटणार नाही, तर जीवन फुलेल” असा संकल्प केला.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक दिवाळे सर, श्रीम. शिदे मॅडम, श्री. माने सर, श्री. वीर सर, सौ. बाणे मॅडम व सौ. कालकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
#रक्षाबंधन #हरितराखी #साटवली #लांजा #वृक्षसंवर्धन #शाळाउपक्रम #रत्नागिरीवार्ताहर
📷 फोटो