शौचालय घोटाळा प्रकरणात 3 वर्षे उलटूनही कारवाई नाही; 14 ऑगस्टला बेलापूर नवी मुंबई मध्ये उपोषण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शौचालय घोटाळा प्रकरणात 3 वर्षे उलटूनही कारवाई नाही; 14 ऑगस्टला बेलापूर नवी मुंबई मध्ये उपोषण

रत्नागिरी प्रतिनिधी :- श्री निलेश रहाटे

रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) सौचालय अंतर्गत लाखो रुपयांचा शौचालय घोटाळा उघडकीस आल्यानंतरही प्रशासनाकडून गेल्या 3 वर्षांपासून ठोस कारवाई झालेली नाही.
तक्रारदार निलेश रहाटे RTI कार्यकर्ता व पत्रकार यांनी माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत पुरावे, सत्य नोटरी प्रतिज्ञापत्र, बनावट बिलांची यादी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिपाई हयांनी घेतलेला बेकायदेशीर लाभ हे सर्व पुरावे जिल्हा परिषद जिल्हाधिकारी रत्नागिरी विभागीय आयुक्त, पालकमंत्री आमदार हयांना सादर करूनही ठोस कारवाई किंवा निर्णय नाही उलट आजपर्यत भ्रामक अहवाल बनून तक्रारदार व वरिष्ठ हयांची दिशाभूल करण्यात येत आहे व दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

याहून धक्कादायक म्हणजे — तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार असता नाही आणि तक्रारीचा अंतिम अहवाल प्रलंबित असतानाही, भ्रष्टाचार ची चौकशी चालू असताना ही तात्कालीन सरपंचाला ZP मार्फत ठेकेदार लायसन्स देण्यात येते….
सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासन बहिरे, दृष्टिहीन असल्याचे चित्र स्पष्ट होत असताना, राजकीय वरदहस्त असणाऱ्यांची कामे विजेच्या वेगाने पूर्ण होत आहेत, हा दुहेरी न्याय उघड आहे.

उपोषण मध्ये तक्रारदाराच्या ठाम मागण्या:

1. दोषींवर फौजदारी गुन्हे तात्काळ नोंदवावेत.

2. भ्रष्टाचार ची अंतिम चौकशी व निर्णय लागे पर्यंत त. सरपंच हयांचे ठेकेदार लायसन्स संबंधित विभागाने तात्पुरते स्थगित करावे.

3. चुकीचे व दिशाभूल करणारे अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी.

ह्या मागण्यासाठी दि 14 ऑगस्ट 2025 रोजी CBD बेलापूर नवी मुंबई इथे उपोषणाला मी व माझे सहकारी बसत आहोत.

सरकारवर विश्वास आहे, पण सरकारनेही नागरिकांवर विश्वास दाखवावा,” असे निलेश रहाटे यांनी ठामपणे सांगितले.
त्यांनी स्पष्ट इशारा दिला की — “न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही.”

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...