🚨 दापोली कृषी महाविद्यालयात प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप; विद्यापीठाची तात्काळ कारवाई
दापोली – दापोली कृषी महाविद्यालयातील एका प्राध्यापकावर विद्यार्थिनीने केलेल्या लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांनंतर कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ पावले उचलत संबंधित प्राध्यापकाला निलंबित केले आहे. थेट कुलगुरूंना दाखल झालेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित प्राध्यापकाची तात्पुरती बदली दुसऱ्या महाविद्यालयात करण्यात आली आहे. तसेच, पीडित विद्यार्थिनीला पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला विद्यापीठाने दिला असून, दापोली पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चौकशी समितीला एक महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली असून, अहवालाच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे. या घटनेमुळे दापोली कृषी महाविद्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
—
#दापोली #कृषीमहोत्सव #लैंगिकछळ #KonkanAgriculturalUniversity #BreakingNews #RatnagiriVartahar