रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी श्री प्रकाश मांडवकर यांची बहुमताने निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी श्री प्रकाश मांडवकर यांची बहुमताने निवड

राजापूर प्रतिनिधी पुरुषोत्तम खांबल :

रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या नूतन अध्यक्ष पदी राजापूर तालुक्यातील कुणबी सहकारी पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश भिकू मांडवकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
कोकणातील पाच जिल्हांतील कुणबी समाजाची मातृसंस्था असलेल्या कुणबी समाजोन्नती संघाच्या अधिपत्याखाली त्या त्या जिल्हयांमध्ये मातृसंस्था आणि तालुका शाखा ग्रामिण समितीमध्ये समन्वय राखण्याचे महत्वपुर्ण काम हे कुणबी समन्वय समिती करत असते. रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीचे काम अधीक जोमाने व्हावे याकरिता रत्नागिरी येथे समन्वय समितीची बैठक संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी पाच वर्षाकरिता रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समिती कार्यकारिणी निवडण्यात आली.
प्रास्ताविक संघ सरचिटणीस कृष्णा वणे यांनी करून संघ निवड प्रकिया याविषयी माहिती दिली. यावेळी अध्यक्षपदाकरिता समाज नेते सुरेश भायजे, प्रकाश मांडवकर व वसंत घडशी यांनी इच्छुक असल्याचे सांगितले. चर्चेअंती वसंत घडशी यांनी माघार घेतल्याने श्री. भायजे व श्री. मांडवकर यांच्यात सर्व संमतीने निवडणुक घेण्यात आली. यावेळी उपस्थित ५४ सदस्यांनी मतदान केले. यावेळी श्री. मांडवकर यांना ३९ तर श्री. भायजे यांना १५ जणांनी मतदान करीत समर्थन दिले. सभाध्यक्ष नवगणे यांनी श्री. मांडवकर यांना विजयी घोषीत केले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात ही प्रकिया पार पडली. यावेळी उर्वरीत कार्यकारिरणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये समितीच्या उपाध्यक्षपदी वसंत घडशी लाजा, नागेश धाडवे खेड, शरदचंद्र गिते रत्नागिरी, रविंद्र घाग दापोली यांची तर सरचिटणीसपदी नितीन लोकम संगमेश्वर तर सहचिटणीसपदी श्रीकांत मांडवकर रत्नागिरी ,रविंद्र कुळे गुहागर, श्रीकांत राघव राजापूर, संदिप खामकर यांची निवड करण्यात आली तर खजिनदारपदी सुधीर वैराग खेड यांची निवड करण्यात आली.
श्री. मांडवकर हे गेली अनेक वर्षे कुणबी समाजाचे काम करत आहेत. समाजाच्या विविध प्रश्नांची त्यांना जाण असून ते सोडविण्यासाठी कार्यरत असतात. या पदाच्या माध्यमातून समाजाचे असलेले प्रलंबीत प्रश्न शासन स्तरावर पोहचवून त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून संघ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. श्री. मांडवकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हाभरातून तसेच विशेष राजापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
या बैठकीला शामराव पेजे न्यासाचे अध्यक्ष अड. सुजित झिमण, रत्नागिरी शाखाध्यक्ष रामभाऊ गराटे, हुमणे गुरूजी, प्रदीप बेंडल, पांडुरंग पाते, दिपक शिगवण, शंकर बाईत, विनायक शिवगण, सुर्यकांत गोताड, गजानन धनावडे, संघाच्या राजापूर ग्रामिण समितीचे अध्यक्ष दिपक नागले, सुरेश बाईत, चंद्रकांत जानस्कर, रमेश सुद, राजापूर शाखा मुंबईचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांसह संघ पदाधिकारी तसेच जिल्हयातील समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.


Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

Leave a Comment

आणखी वाचा...