साटवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था उपाध्यक्ष पदाची निवडणूक संपन्न..
लांजा प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण)
साटवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या साटवली तालुका लांजा या संस्थेच्या रिक्त उपाध्यक्ष पदाची निवड सोमवार दिनांक 11/ 8 /2025 रोजी सायंकाळी चार वाजता पार पडली.
संस्थेचे माजी उपाध्यक्ष इर्शाद बरमारे यांनी संस्था उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले संस्थेचे उपाध्यक्ष पद हे रिक्त झाले होते.
दि. 11/ 8/ 2025 रोजी चे उपाध्यक्ष निवडे वेळी प्रसाद भालेकर यांचा एकमेव अर्ज असलेले ने एकमताने संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवडून आले.
संस्थेच्या रिक्त उपाध्यक्षपदी निवडीसाठी अध्यक्ष अध्याशी अधिकारी म्हणून श्री संतोषकुमार पाटील यांची प्राधिकरणाने निवड केले नुसार त्यांनी निवड प्रक्रिया पार पाडली.
उपाध्यक्ष निवडीनंतर नवीन उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून सभा संस्थेने त्यांचे अभिनंदन करून सभा संपले चे जाहीर करण्यात आले.
सदर सभेवेळी संस्थेचे संचालक मंडळ सदस्य शांताराम तरळ, शांताराम कांबळे, सौ. लक्ष्मी कांबळे, महेंद्र नारकर, प्रसाद भालेकर, आदेश आंबोळकर, दत्ताराम सावंत, रमेश जाधव असे सहा संचालक व संस्था सचिव राजेश शेरे हे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत संस्था सचिव यांनी केले तर निवडीनंतर सर्वांचे आभार आंबोळकर यांनी मानले.