गौरी गणपतीत गुहागरमधील अवजड वाहतूक व रस्त्यालगतची खोदाई बंद करण्याची मागणी!

🚫 गौरी गणपतीत गुहागरमधील अवजड वाहतूक व रस्त्यालगतची खोदाई बंद करण्याची मागणी!

➡️ भाजप माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे तहसीलदार, पोलिस व प्रशासनाला लेखी निवेदन

आबलोली (संदेश कदम)

कोकणवासीयांच्या आत्मीयतेचा गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मुंबई, पुणे व इतर शहरांमधून चाकरमानी मोठ्या प्रमाणात गुहागरकडे येतात. त्यामुळे महामंडळाच्या जादा गाड्या, खाजगी प्रवासी वाहतूक, वैयक्तिक गाड्या व दुचाक्यांची संख्या प्रचंड वाढते. या गर्दीतून वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर भाजप गुहागर तालुक्याचे माजी अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत गुहागर तालुक्यातील सर्व अवजड वाहतूक थांबविण्याची मागणी केली आहे.

🚛 बंद करण्याची मागणी असलेली वाहतूक:

  • अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीतून होणारी गॅस निर्यात वाहतूक
  • गुहागरमधून बाहेर जाणारी जांभा दगड वाहतूक
  • तवसाळ पुलासाठीची मालवाहतूक
  • तसेच तालुक्यातील अन्य अवजड वाहनांची वाहतूक

📍 याशिवाय सणकाळात महावितरण आणि एअरटेल कंपनीकडून सुरू असलेली भूमिगत केबलसाठीची धोकादायक रस्त्यालगतची खोदाईदेखील १५ दिवस तात्काळ थांबवावी, अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.

निलेश सुर्वे यांनी ही मागणी गुहागर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सां.बां. विभाग, म.रा.वि.वि. कंपनीचे उपकार्यकारी अभियंता तसेच कोकण एलएनजी कंपनी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

 


✅ हॅशटॅग्स:

#गौरीगणपती #गुहागर #वाहतूकबंदी #निलेशसुर्वे #रत्नागिरी #कोकण

📸 फोटो

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें