श्रावणात पारगाव सुद्रिकेत सुद्रिकेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात 🎉

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟣श्रावणात पारगाव सुद्रिकेत सुद्रिकेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात 🎉

 

धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल; ह.भ.प. हांडे महाराजांच्या भारूडाने रंगली सभा 🎶

अहिल्यानगर – पारगाव सुद्रिक :

श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र पारगाव सुद्रिक येथे श्री सुद्रिकेश्वर महाराज यांची पालखी मोठ्या भक्तिभावात व जल्लोषात काढण्यात आली. सोमवारी झालेल्या या सोहळ्यात धार्मिक, सामाजिक आणि समाजप्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पालखी समोर विठ्ठल-रखुमाई मैदानावर रंगीत भारूड कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सेनगाव येथील ह.भ.प. हांडे महाराज व सहकाऱ्यांच्या भारूड सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तसेच श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या पालखीसमोर मोटेवाडी व खेतमाळीसवाडी येथे लिहिण्याचा डावही मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे आयोजन पारगाव सुद्रिक येथील तरुण मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमासाठीचा सर्व खर्च सामाजिक युवा कार्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज मल्टीस्टेट सहकार बँक, एजंट व दानशूर व्यक्तींनी उचलला. यावेळी ह.भ.प. सुहास तात्याराम मोटे पाटील यांनी ह.भ.प. हांडे महाराज यांचा १७,१०१ रुपयांच्या बंद पाकीट देणगीद्वारे सन्मान केला.

या प्रसंगी ग्रामस्थांसह शहाजी हिरवे, माऊली शेठ हिरवे, पत्रकार नंदकुमार बगाडे, पाटील दिवाण शिंदे, रशीद शेख, कदम भाऊसाहेब, राहुल शेठ, दानवे पाटील, संदीप काळे पाटील, ह.भ.प. बापू हिरवे, सचिन धोत्रे, सुदाम खेतमाळीस, खंडू आरू, सुरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

🔖हॅशटॅग्स :

#पारगावसुद्रिक #सुद्रिकेश्वरमहाराज #पालखीसोहळा #श्रावणउत्सव #भारूडकार्यक्रम #हभपहांडे महाराज #कोकणवार्ता #रत्नागिरीवार्ताहर

 

 

📸 फोटो

 

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...