ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारुण पराभव!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

💥 ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारुण पराभव!

 

शशांक राव पॅनेलने १४ जागांवर विजय; महायुती पॅनेलला ७ जागा

 

मुंबई :

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. या पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. तर, फारशा चर्चेत नसलेल्या शशांक राव पॅनेलने तब्बल १४ जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे. तसेच महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला ७ जागा मिळाल्या आहेत.

 

या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान पार पडले होते. मंगळवारी निकाल जाहीर होणार होता; मात्र मुंबईतील मुसळधार पावसामुळे मतमोजणी उशिरा सुरु झाली. अखेर मंगळवारी रात्री उशीरा अंतिम निकाल जाहीर झाला.

 

या पराभवामुळे ठाकरे गट आणि मनसेची चिंता वाढली आहे. कारण शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेने आणि मनसेच्या बेस्ट कामगार कर्मचारी सेनेने एकत्र येऊन उत्कर्ष पॅनेल उभारले होते. मात्र, त्यांना एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेची बेस्ट पतपेढीतील गेल्या ९ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.

 

दुसरीकडे, भाजप आमदार प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांची श्रमिक उत्कर्ष सभा, आमदार नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदे गटाचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित येऊन सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवले होते. या पॅनेलला ७ जागा मिळाल्या आहेत. तर, बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकत मोठा विजय साकारला आहे.

 

🔖 हॅशटॅग्स :

 

#BestPatpedhiElection #ThackerayBrothers #ShashankRaoPanel #Mahayuti #MumbaiNews #PoliticalUpdate #RatnagiriVartahar

 

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...