रत्नागिरी जिल्हा फोटो असो. वतीने छायाचित्रण दिन जल्लोशात
गुहागर- (वार्ताहर)~रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओ असोसिएशन च्या वतीने 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनाचा अवचित्याने जिल्ह्यात फोटो फेअर तसेच जिल्हा मेळाव्याचे आयोजन विविध तालुक्याच्या ठिकाणी केले जाते. यावर्षीचा जागतिक छायाचित्रण गुहागर येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय सचिन शेठ बाईत, अध्यक्ष चंद्रकला उद्योग समूह आबलोली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहिलजी आरेकर, अध्यक्ष सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर आणि माननीय मनोज बावधनकर अध्यक्ष पत्रकार संघ गुहागर हे होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून फोटो फेअरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर आणि रत्नागिरी जिल्ह्या फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय संजय शिंदे सर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, कार्याध्यक्ष गुरु चौगुले, सचिव प्रवीण पाटोळे, खजिनदार सुरेंद्र गीते, गुहागरचे तालुकाध्यक्ष समीर बावधनकर, तसेच प्रसिद्ध फोटोग्राफी प्रशिक्षक माननीय प्रमोद जी गायकवाड सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन कॅमेरा पूजन करण्यात आले. सामुहिक प्रार्थना तसेच जिल्ह्यातील फोटोग्राफी क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवर,पदाधिकारी व सर्व तालुका असोसिएशनचे यावेळी सत्कार करण्यात आले
जिल्हा संघटनेच्या वतीने फोटोग्राफर प्रगत, प्रशिक्षित आणि संघटित व्हावा यासाठी आयोजित केलेली शेकडो कार्यशाळा, वेबिनार तसेच सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर, तसेच फोटोग्राफरच्या अडीअडचणीमध्ये जिल्हा असोसिएशन करत असलेली मदत याची माहिती घेऊन मान्यवरांनी संघटनेबाबत गौरव उद्गार काढले. तसेच जिल्हा असोसिएशनने अगदी अल्पावधीतच महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर असोसिएशन म्हणून नाव केल्या बद्दल सर्वांना अभिमान असल्याचे सांगितले.
स्नेहभोजनानंतर दुपारच्या सत्रात प्रसिद्ध छायाचित्रकार प्रशिक्षक माननीय प्रमोद गायकवाड सर यांचे वेडिंग फोटोग्राफी या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभले तसेच मॉडेल घेऊन लग्नाचे फोटोग्राफी उपलब्ध लाईट मध्ये कशी करावी यावर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर केक कटिंग करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील फोटोग्राफी संबंधित नामांकित कंपन्या आपले उत्पादन विक्री साठी उपस्थित होते. जिल्ह्यातील बहुसंख्य फोटोग्राफर व सर्व तालुका असो.देखील यावेळी हजर होते.