लांजा-साटवली रस्त्याची दुरावस्था दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्पर कारवाई!
कोंडये सरपंच मनोज चंदुरकर यांनी व्यक्त केला समाधान व्यक्त
लांजा (जितेंद्र चव्हाण प्रतिनिधी) : लांजा-साटवली या कायम वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे आणि पाणी साचल्यामुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले होते. या रस्त्याची अवस्था अक्षरशः तलावासारखी झाली होती. विशेषतः कोंडये गावातून साटवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गटार नसल्याने पाणी साचत होते आणि त्यामुळे अपघातांच्या घटना घडत होत्या.
या समस्येबाबत कोंडये ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज चंदुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजा यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार विभागाने तत्काळ कारवाई करत रस्त्यालगत गटार लाईन खोदण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आता रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
याशिवाय रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजवण्याचे कामही सुरू झाले असून कोंडये येथील गतिरोधकावर (स्पीडब्रेकर) कलरपट्टा मारण्याची मागणी सरपंच चंदुरकर यांनी केली आहे.
सदर काम मार्गी लागल्यामुळे सरपंच मनोज चंदुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजा तसेच रत्नागिरी वार्ताहर डिजिटल न्यूज यांचे आभार मानले.
—
✅ हॅशटॅग्स :
#लांजा #साटवली #कोंडये #रत्नागिरीवार्ताहर #PublicWorks #RoadRepair
📷