मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाचे उज्वल यश 

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाचे उज्वल यश 

रत्नागिरी – संदीप शेमणकर

मुंबई विद्यापीठ अंतर्गत ५८ वा युवा महोत्सव २१ ऑगस्ट २०२५ रोजी. भारत शिक्षण मंडळ कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे पार पडला. या युवा महोत्सवात वादविवाद स्पर्धेतील “आजची तरुणाई अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकत चालली आहे” या विषयावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत कु.सानिका सुरेंद्र पोतकर आणि कु.सोनाली संतोष चौगुले या विद्यार्थिनींनी गौरवास्पद कामगिरी केली आणि महाविद्यालयाच्या नामांकनात भर घातली.या वादविवाद स्पर्धेसाठी प्रा.अमित पवार तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ओंकार लिंगायत यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मौलिक आणि प्रभावी मार्गदर्शन केले. या विजयी स्पर्धकांना मा.निलेश सावे सर (मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग प्रमुख), मा.सुनील वणजू सर (संस्था पदाधिकारी) तसेच मा.नमिता कीर (संस्था कार्याध्यक्षा) अशा मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी, प्र. प्राचार्य प्रमोद वारीक सर तसेच सर्व प्राध्यापकवृंद अशा सर्वच स्तरातून विजयी विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...