खास कॅनडा देशातून पीएमश्री स्कूल वेळणेश्वर प्रशालेतील विद्यार्थ्यांशी साधला ऑनलाईन सुसंवाद
इकोफ्रेंडली गणेशोत्सव विषयावर डॉ स्वाती गाडगीळ यांचे मार्गदर्शन
पीएमश्री इकोक्लब च्या वतीने आयोजन
रत्नागिरी (प्रतिनिधी)
पीएमश्री इको क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत खास कॅनडा या देशातून सुप्रसिद्ध डॉक्टर,लेखिका प्रेरणादायी व्याख्यात्या, सामाजिक कार्यकर्त्या डाॅ.स्वाती गाडगीळ यांनी पीएमश्री स्कूल वेळणेश्वर प्रशालेतील विद्यार्थ्यांशी “पर्यावरणपुरक गणेशोत्सव” या महत्त्वपुर्ण विषयावर गुगल मीटव्दारे ऑनलाईन सुसंवाद साधला त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लवकरच श्रीगणेशाचे आगमन घरोघरी होणार आहे दररोजची पुजेची फुलं, दुर्वा,व निर्माल्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा याविषयीची जनजागृती व्हावी यासाठी इको क्लब च्या वतीने या मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांशी थेट कॅनडा देशातून ऑनलाईन शुद्ध मराठी भाषेत संवाद साधत पर्यावरणपुरक गणेशोत्सवासंदर्भात केलेले हितगुज सर्वांना भावले. श्रीगणेशोत्सवातील निर्माल्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या ऐवजी कागदी पिशव्या स्वतः बनवून वापरण्याचे तसेच आपण बनवलेल्या किमान ५ पिशव्या इतरांना निर्माल्यासाठी वापरण्यासाठी देण्याचे आवाहनही डॉ स्वाती गाडगीळ यांनी यावेळी प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांना केले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमात पीएमश्री स्कूल इको क्लब मोठ्या उत्साहात सहभागी होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यावेळी सांगितले सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतिश नलावडे पदवीधर शिक्षिका शैलजा साळे उपशिक्षक उमेश नाटेकर उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर उपशिक्षिका सुलक्षणा करडे -राशिनकर उपशिक्षिका भारती गोवेकर शिक्षण सेविका प्रियंका पवार अंजुम शेख तेजस्विनी जगताप आदींनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबासाहेब राशिनकर यांनी केले*