मद्यविक्री परवाना वाटपात राजकीय घराण्यांचा मोठा वाटा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


🍷🥃 मद्यविक्री परवाना वाटपात राजकीय घराण्यांचा मोठा वाटा!

नवे ३०% परवाने भाजप व दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नातेवाईकांकडे; महसूल वाढीच्या नावाखाली राजकीय लाभार्थ्यांचीच लॉटरी

मुंबई :
राज्यात मद्यविक्री दुकानांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने ४१ मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे ३२८ नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यातील तब्बल ९६ परवाने (सुमारे ३० टक्के) हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित उद्योगांच्या नावावर जाणार असल्याचे उघड झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने आलेल्या या धोरणामुळे, महसूल वाढवण्याच्या नावाखाली राजकीय घराण्यांचे हात मात्र ‘ओले’ होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

🔸 भाजप नेत्यांशी संबंधित ५ कंपन्यांना ४० परवाने
🔸 अजित पवार गटातील ४ कंपन्यांना ३२ परवाने
🔸 शरद पवार गटातील ३ कंपन्यांना २४ परवाने

भाजपकडील प्रमुख लाभार्थी

डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांची डेल्टा डिस्टिलरीज
पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन पालवे यांची रॅडीको एन.व्ही. डिस्टिलरीज
नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी संचालक असलेली मानस ॲग्रो इंडस्ट्रीज
आमदार अतुल भोसले यांच्याशी संबंधित यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना
आमदार सुभाष देशमुख यांचे पुतणे महेश देशमुख यांची लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज

अजित पवार गटातील प्रमुख लाभार्थी

संजयमामा शिंदे संचालक असलेली विट्ठल कार्पोरेशन
राजन पाटील यांच्या भागीदारांची नक्षत्र डिस्टिलरीज
सदानंद बापट यांच्या ॲडलर्स बायो एनर्जीअसोसिएटेड ब्लेंडर्स

शरद पवार गटातील प्रमुख लाभार्थी

जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील अध्यक्ष असलेला राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
माजी आमदार मानसिंग नाईक यांची कुटुंबीय संचालक असलेली विराज अल्कोहोल्स
सोनिया होळकर यांचे पती सत्यजित होळकर संचालक असलेली ग्रेनॉच इंडस्ट्रीज

👉 परवाना मिळवण्यासाठी प्रत्यक्षात १ कोटी रुपये लागणार असून, नंतर हे परवाने भाड्याने देऊन उद्योजकांना प्रचंड आर्थिक लाभ होणार आहे. यातील अनेक कारखाने प्रत्यक्षात बंद असून, केवळ परवाना मिळवण्यासाठीच कागदोपत्री सुरू असल्याचे समजते.

प्रतिक्रिया

📌 “मद्यविक्री परवान्यांची मागणी आमच्या कंपनीने केलेली नाही. वाइन शॉप व्यवसायाशी आम्ही संबंधित नाही.”सारंग गडकरी
📌 “माझ्या कंपन्यांचा जय पवार यांच्याशी काही संबंध नाही.”सदानंद बापट
📌 “नव्या परवान्यांमुळे परप्रांतीयांची ५० वर्षांची मक्तेदारी संपणार आहे.”मानसिंग नाईक
📌 “लोकप्रतिनिधी आणि व्यवसाय या दोन वेगळ्या बाबी आहेत.”आ. सुभाष देशमुख

 

 


हॅशटॅग्स :

#मद्यविक्री #राजकीयघराणेशाही #परवाना_वाटप #भाजप #राष्ट्रवादी #महाराष्ट्रराजकारण #ExcisePolicy


📸

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...