✨ खोडदे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पडवे जि.प.गटाची सभा; आमदार भास्कर शेठ जाधव ग्रामस्थांसोबत विकासावर करणार चर्चा.
गुहागर ~आबलोली.
खोडदे : आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पडवे गटातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा परिषद पडवे गटाने ग्रामस्थांच्या विकास कामांसाठी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० वा. खोडदे आठवडा बाजार (ग्रामपंचायत खोडदे) येथील सहाणेवर सभागृहात ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत आमदार भास्कर शेठ जाधव ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेटून पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा, शैक्षणिक सुविधा, तरुणांच्या रोजगाराच्या संधी आदी प्रश्नांवर थेट संवाद साधणार आहेत. स्थानिक विकासकामांवर चर्चा करताना निवडणूक पूर्वतयारीलाही सुरुवात होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
गेल्या काही काळापासून पडवे गटातील नागरिक विविध मूलभूत सुविधांच्या समस्यांना सामोरे जात आहेत. ग्रामस्थांनी अनेकवेळा जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे पाठपुरावा करूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. यावेळी आमदार जाधव थेट ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून त्यावर उपाययोजना जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बैठकीचे आयोजन श्री. सचिन चंद्रकांत बाईत (तालुकाप्रमुख), श्री. काशिनाथ मोहिते (उप तालुका प्रमुख), श्री. रविंद्र आंबेकर (विभागप्रमुख) तसेच उपविभाग प्रमुख श्री. शरद साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पडवे गटातील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने झुकतात याची चुणूक मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बातमी ~ सुजित सुर्वे, पडवे
🔖 हॅशटॅग्स :
#ShivsenaUBT #BhaskarJadhav #Khode #Padve #Ratnagiri #LocalElections #Vikas #RatnagiriPolitics