विरारमध्ये ४ मजली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू; २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

💥💥 ब्रेकींग बातमी

🟣  विरारमध्ये ४ मजली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू; २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई– महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. त्यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची एक बाजू कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या चार मजली इमारतीमध्ये बारा कुटुंब राहत होती. त्यापैकी नऊ जणांना डिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर 20 ते 25 जण इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या सध्या घटनास्थळी एन.डी.आर.एफ. टिम आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची टिम रेस्क्यूच काम करत आहे. आतापर्यंत 9 जणांना रेस्क्यू करुन, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मलब्यात अडकलेल्या नागरिकांची माहीती मिळावी यासाठी डॅागस्कॅाट आणण्यात आला आहे. त्याद्वारे ही सर्च ॲापरेशन सुरु आहे. विरारच्या नारंगी फाटा येथील रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना रेस्क्यू करुन त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शोधकार्य सुरु आहे. सध्या या इमारतीमध्ये काही नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...