ठरलेल्या लग्नात अडसर नको म्हणून प्रेयसीचा खून; मृतदेह आंबाघाटात फेकला

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

ठरलेल्या लग्नात अडसर नको म्हणून प्रेयसीचा खून; मृतदेह आंबाघाटात फेकला

रत्नागिरीत संतापाची लाट – प्रियकरासह तीन जण अटकेत

रत्नागिरी (प्रतिनिधी) – रत्नागिरी शहर हादरवून सोडणाऱ्या खून प्रकरणामागील धक्कादायक सत्य उघड झाले आहे. प्रेयसी गर्भवती असल्याने आणि त्याच्या ठरलेल्या दुसऱ्या लग्नात अडसर येऊ नये, या कारणावरून प्रियकरानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने तिचा खून करून मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

🔴 अशी आहे घटना

मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मयेकर (२६) हिचे जंगमवाडी, वाटद खंडाळा येथील दुर्वास दर्शन पाटील (२५) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून भक्ती गर्भवती राहिली आणि लग्नासाठी तगादा लावू लागली. मात्र, दुर्वासचे दुसरीकडे लग्न ठरले होते. अडसर दूर करण्यासाठी त्याने आपल्या साथीदार विश्वास विजय पवार (४१) आणि सुशांत शांताराम नरळकर (४०) यांच्या मदतीने कट रचला.

१६ ऑगस्ट रोजी दुर्वासने भक्तीला आपल्या ‘सायली देशी बार’ येथे बोलावले. तिथेच वरच्या खोलीत केबलने तिचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह वॅगनआर कारमधून आंबा घाटात नेऊन निर्जन दरीत फेकण्यात आला.

🔴 मृतदेह शोध मोहिम

भक्ती बेपत्ता असल्याने तिच्या भावाने पोलिसांत तक्रार केली. तपासादरम्यान दुर्वासला चौकशीअंती कबुली द्यावी लागली. शनिवारी पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने दरीतून मृतदेह बाहेर काढला. गुलाबी नक्षीकाम ड्रेस आणि हातावरील टॅटू वरून मृतदेहाची ओळख पटली.

🔴 धक्कादायक माहिती

भक्तीचा खून करून अवघ्या दोन दिवसांतच दुर्वासने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केला, अशी माहिती कुटुंबीयांकडून समोर आली.

दुर्वास पाटील हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून खंडाळ्यात त्याचा बार व दारूचे दुकान आहे.

यापूर्वीही एका तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह याच दरीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

🔴 तपास पोलिसांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली

उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश माईनकर, पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, उदय झावरे आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

📌 हॅशटॅग्स

 

#रत्नागिरीखूनप्रकरण #प्रेयसीचाखून #आंबाघाट #RatnagiriCrime #BreakingNew

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...