आझाद मैदान सोडण्यासाठी मुंबई पोलिसांची नोटीस; मनोज जरांगे ठाम – “मेलो तरी मैदान सोडणार नाही”
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पोलीस नोटीस; उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा उल्लेख. पुढील काही तासांत आंदोलकांची भूमिका काय असेल याकडे लक्ष.
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू ठेवणारे मनोज जरांगें पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. मुंबई पोलिसांनी आझाद मैदान रिकामं करण्याची अधिकृत नोटीस मनोज जरांगेंना दिली. दुपारी पोलीस अधिकारी स्वतः मैदानावर पोहोचले, नोटीस आधी मराठा समाजाच्या वकिलांना दाखवली आणि नंतर झोपेत असलेल्या जरांगेंच्या हातात ठेवली.
जरांगे यांनी सकाळीच प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते –
“मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. सरकार कुठल्याही थराला गेलं तरी मी तयार आहे. मला जेलमध्ये टाकलं तरी मी उपोषण सुरू ठेवेन.”
दरम्यान, पोलिसांच्या नोटीसीत म्हटलं आहे की, २९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडली आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय, मुंबई उच्च न्यायालयाच्या २६ ऑगस्टच्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन झाल्याने आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली असून आझाद मैदान तातडीने रिकामं करण्याचे आदेश दिले आहेत.
👉 पुढील काही तासांत जरांगे आणि मराठा समाजाची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
हॅशटॅग
#मराठा_आरक्षण #मनोजजरांगे #आझादमैदान #MumbaiPolice #BreakingNews