कोतळूक उदमेवाडी येथील ग्रामस्थांनी जपलेय भजन, पारंपारिक संगीत व जाकडी नाचाची 100 वर्षाची परंपरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोतळूक उदमेवाडी येथील ग्रामस्थांनी जपलेय भजन, पारंपारिक संगीत व जाकडी नाचाची 100 वर्षाची परंपरा

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील उदमेवाडी येथे ब्राह्मण, भंडारी, मराठा, तेली, सोनार, नाभिक, परीट, कुणबी, सुतार,वाणी ज्ञातीमधील बांधव अनेक पिढ्या एकत्रितपणे गेली कित्येक वर्षापासून आजही प्रत्येकाच्या सुख – दुःखाच्या प्रसंगात संघटितपणे कामकाज करत आहेत. वेगवेगळे उदयोग करणारे उदिम म्हणूनच या वाडीचे “उदमेवादी” हे नाव झाले असून हे नाव आजही त्याच डौलाने नावारूपास येत आहे. सार्वजनिक ठिकाण म्हणून या वाडीचे श्रद्धास्थान असलेले

“श्री. हनुमंताचे मंदिर” असून अनेक वर्ष दोन दिवस मोठ्या धुमधडाक्यात ” हनुमंताचा जन्मोत्सव ” साजरा करण्यात येतो

कै. पांडुरंग चव्हाण, श्री दत्तात्रय ओक यांनी अनेक वर्ष या वाडीचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर सुरेश आरेकर, दिलीप मोहिते, अनंत चव्हाण यांनी या वाडीच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून सध्या समीर ओक वाडीच्या अध्यक्षपदाची धुरा सर्वांच्या सहकार्याने सांभाळत आहेत. “श्री हनुमंताचा जन्मोत्सव”,” गोकुळाष्टमी”, “गणपती उत्सव”,”नवरात्र उत्सव”,” शिमगा उत्सव”असे सार्वजनिक कार्यक्रम आनंदाने साजरे केले जातात. या वाडीमध्ये सद्या 52 घरे 60 कुटुंब असून कामानिमित्त गणपती सणांमध्ये काही जन मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी राहत असतात “श्री हनुमंताचा जन्मोत्सव”,” शिंगोत्सव”, “गणपती”सणामध्ये हे सर्वजण गावी येतात. गणपती सणांमध्ये पिढ्या-पिढ्या पारंपारिक संगीत व जाखडी नाचाची 100 वर्षाची परंपरा आजही येथील ग्रामस्थांनी कायम राखली आहे.

गणपतींचे आगमन झाल्यानंतर दररोज वेगवेगळ्या 6 ते 7 घरांमध्ये या पारंपरिक संगीत नाचाबरोबर ढोलकी वरचा नाच सुद्धा करत आहेत पारंपरिक संगीत व जाकडी नाचांची परंपरा अखंडित ठेवण्यामध्ये गायक बुवा म्हणून कै. आत्माराम चव्हाण, कै. काशिनाथ महाडिक, कै. पांडुरंग महाडिक, कै, दत्तात्रय महाडिक, श्री. बापू महाडिक तसेच गायक आणि वादन कै. राजाराम चव्हाण,श्री.वसंत महाडिक, वसंत सकपाळ यांचा मोठा सहभाग असून गायक म्हणून सध्या ही कला अनंत चव्हाण जोपासत आहेत. या नाचात जी गाणी असतात ती चढत्या आवाजात विविध चालीत गायली जातात. महाभारत, रामायणातील अनेक विषय या गाण्यांमध्ये असतात.या संगीत व जाखडी नाचांमध्ये गायनाबरोबर वादन व नाचणारे मंडळी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. हे वादन कै. शिवाजी चव्हाण,सुशील भाऊ चव्हाण, कै. दत्ताराम आरेकर यांनी करत हा वारसा सध्या अनिल चव्हाण, सुधीर झुंबर चालवीत आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने नाच होण्यासाठी त्या काळात कै.पांडुरंग आरेकर हे काठी घेऊन लक्ष ठेवून असायचे एखादा कोणी चुकला किंवा योग्य पद्धतीने नाच करत नसेल किंवा नवीन पिढीतील कोणी नाचायला टंगळमंगळ करत असेल तर त्याला शिस्त शिकवण्याचे काम त्यांची काठी करत होती. या नाचांची परंपरा अखंडित ठेवण्यामध्ये वरील ग्रामस्थ तसेच अनेकांचा सहभाग आहे

गणेशोत्सव म्हणजे एक आनंदाचा मेळावाच असतो संध्याकाळी एकमेकांकडे आरतीसाठी जाण्याबरोबर एखाद्याच्या घरी वर्षभरात केव्हाही काही धार्मिक कार्यक्रम असल्यास तशी यजमानांची इच्छा असेल त्यानुसार वाडीचे “हनुमान प्रसादिक भजन मंडळाचे वारकरी” किंवा “संगीत भजन” संगीत भजन सेवेतही मोठ्या उत्साहात मंडळी सामील होत असतात. अलीकडच्या काळात सुधीर झिंबर, अनंत चव्हाण, सचिन ओक यांनी हा भजनाचा वारसा समर्थपणे सांभाळत आहेत त्याशिवाय वाडीच्या अंजनी माता महिला भजन मंडळामध्ये सौ.वंदना झिंबर आणि अनुजा चव्हाण या गायक बाजू सांभाळत भजनी कला सादर करीत असतात असा सांस्कृतिक धार्मिक पारंपरिक ठेवा आजही अखंडपणे गुहागर तालुक्यातील कोतळूक गावच्या 10 समाज एकत्र असलेल्या उदमेवाडी येतील ग्रामस्थांनी जपला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...