रत्नागिरी तालुका व शहर कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

रत्नागिरी तालुका व शहर कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न!

आगामी निवडणुकांसाठी गण/प्रभाग निहाय आढावा व नियोजन

रत्नागिरी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी तालुका व शहर कार्यकारिणीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गण/प्रभाग निहाय आढावा घेणे आणि बैठकींचे नियोजन यासाठी ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागांची संख्या व व्याप्ती निश्चित करण्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध झाली असून त्यावर हरकती घेण्यासाठी तसेच पुढील निवडणुकांबाबत धोरण ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली.

बैठक शिवसेना नेते सचिव तथा माजी खासदार विनायकजी राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.

यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर संघटक प्रसाद सावंत, महिला विधानसभा संघटक सौ. सायली पवार, युवासेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, प्रकाश जाधव, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड यांच्यासह तालुका व शहरातील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

🔖 हॅशटॅग्स

 

#रत्नागिरी #शिवसेना #उद्धवबाळासाहेबठाकरे #जिल्हापरिषदनिवडणूक #नगरपरिषदनिवडणूक #पंचायतसमितीनिवडणूक #RatnagiriPolitics

 

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...