ठाकरे बंधू एकत्र येणं शरद पवारांना मान्य आहे का? अन् काँग्रेसचं काय? संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟪🟪

ठाकरे बंधू एकत्र येणं शरद पवारांना मान्य आहे का? अन् काँग्रेसचं काय? संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-मनसे युतीच्या चर्चांना वेग, शरद पवार हरकत घेणार नाहीत, काँग्रेसलाही माहित – संजय राऊत

मुंबई–  आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मनसे युतीच्या जोरदार चर्चा होत आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे बंधूंच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत. गत आठवड्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटाघाटीसाठी ठाकरे बंधूंची भेट झाल्याचे कळते. शिवसेना-मनसेची युती झाल्यास आघाडीतील घटक पक्षांची काय भूमिका असणार? याकडे लक्ष लागलेले असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे.

विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सकारात्मक असतील का? अशी चर्चा आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत काहीही अडचण नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये शंभर टक्के शिवसेनेचीच ताकद आहे. भाजपकडे एक विशिष्ट वर्ग आहे. तसेच त्यांच्याकडे पैसा आणि सत्ता आहे. तरीही मुंबईवर पगडा मराठी माणसांचा राहील. तो त्यांना नष्ट करायचा आहे. त्यांनी सातत्याने तसे प्रयत्न सुरु केले आहेत. तो आम्हाला हाणून पाडायचा आहे. हे काम फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यावरच आपल्याला करता येईल. हे काँग्रेसलाही माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मला असं वाटतं की शरद पवार यांचा विषय तसा अडचणीचा नाहीय. त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत. काँग्रेसचं दिल्लीतलं जे हायकमांड आहे, काँग्रेसचे अध्यक्ष असतील, खासदार राहुल गांधी असतील किंवा इतर नेते असतील, मुंबई महाराष्ट्रात काय चालू आहे याची महाराष्ट्रातील काँग्रेसचं नेतृत्व देत असेल. विषय फक्त मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. आतापर्यंत मनसेने स्वतंत्र निवडणुका लढलेल्या आहेत. त्यांनी कुणाबरोबर युती केली असं दिसलेली नाही. त्यांची प्रथमच शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता आहे, असं संजय राऊत म्हणाले. राज-उद्धव एकत्र आल्यास काँग्रेसची काय भूमिका असेल, याविषयी विचारले असता, दिल्लीतील हाय कमांडला मुंबई महाराष्ट्रात काय चाललंय, हे इथले काँग्रेस नेते माहिती देतील. शेवटी मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व जिवंत ठेवायचे असेल तर राज-उद्धव एकत्र यायला हवेत, हे काँग्रेसला देखील माहिती आहे. त्यासंबंधीचा योग्य अहवाल काँग्रेस नेते हायकमांडला देतील, असे राऊत म्हणाले

काँग्रेसच्या भूमिकेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील नेते दिल्ली हाय कमांडला याबाबत योग्य माहिती देतील. *“शेवटी मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर राज-उद्धव ठाकरे एकत्र यायलाच हवेत,”* असे राऊत यांनी ठामपणे नमूद केले.

***

### Hashtag Mix

#ठाकरेबंधू #संजयराऊत #शरदपवार #उद्धवठाकरे #राजठाकरे #शिवसेना #मनसे #मुंबईमहापालिका #महाविकासआघाडी #Congress #MaharashtraPolitics #मराठिमाणूस

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला