ओबीसी समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यामंत्र्यांकडे पोहोचवणार – आमदार किरण सामंत

ओबीसी समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यामंत्र्यांकडे पोहोचवणार – आमदार किरण सामंत

राजापूर प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण जाहीर करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची ग्वाही दिलेली आहे. तरीही राजापुरातील समस्त ओबीसी समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पोहाविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही आमदार किरण सामंत यांनी ओबीसी समाज बांधवांना दिली.
हैद्राबाद गॅजेटीअरमधील नोंदी विचारात घेवून मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय झाला असून या निर्णयविरोधात राज्यात सर्वत्र ओबींसींकडून आंदोलने, निवेदने देण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी ओबीसी समाज बांधवांनी आ.सामंत यांची भेट घेत विविध मागण्याचे निवेदन सादर केले.   राजापूर तालुक्यात 80 टक्के ओबीसी समाज आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय हा ओबीसींना अडचणीत टाकणारा आहे. त्यामुळे निर्णय रद्द करण्यात यावा, तसेच ओबीसांच्या विविध मागण्या, समस्या या निवेदनाच्या माध्यमातून शासन दरबारी पोहाचवाव्यात, अशी मागणी यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांनी केली. त्यावर आ.सामंत यांनी समस्त ओबीसी समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहावून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर यांच्यासह सचिव चंद्रकांत जानस्कर, दिपक नागले, ऍड. शशिकांत सुतार, रविंद्र नागरेकर, प्रकाश कुवळेकर, संतोष हातणकर, दिपक बेंद्रे, प्रकाश झोरे, डी.एम. चव्हाण, विनोद शेलार, जितेंद्र पाटकर, श्रीकांत राघव, अरविंद लांजेकर, उमेश पराडकर, सुभाष नवाळे, रमेश सुद, बबन तांबे, प्रसाद गुरव, संतोष कुळये, नरेश दुधवडकर यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसीमधील विविध संघटनांचे पदाधिकारी, ओबीसी बांधव उपस्थित होते➖➖➖➖➖➖➖➖
🔊 *” लोकनिर्माण डिजिटल ” मीडियावर जाहिरात व बातम्यांसाठी 89839 58401 /92705 79400 /9765099526 या क्रमांकावर संपर्क साधा.*

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें