छत्रपती संभाजीनगर- पाचोड,वार्ताहर ….
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे जी ह्यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी तेथील नुकसानग्रस्त शेतकरी यांचे शी बोलत असताना त्यांची आस्थेने चौकशी केली शासान नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणार नाही याची काळजी घेऊ.
ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
