माकड-केल्टी उपद्रव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा; आंबा पिक नुकसान पिकविमा अंतर्गत घ्या – मिलिंद चाचे यांची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माकड-केल्टी उपद्रव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा; आंबा पिक नुकसान पिकविमा अंतर्गत घ्या – मिलिंद चाचे यांची मागणी

आंबा बागायतदारांचे सतत होणारे नुकसान लक्षात घेऊन शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी

आबलोली (संदेश कदम,प्रतिनिधी) आंबा हे कोकणातील प्रमुख नगदी पीक असून यामुळे शासनाला चांगला महसूल मिळतो. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार गेल्या अनेक वर्षांपासून माकड, केल्टी यांचा वाढता उपद्रव तसेच अवेळी पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जात आहेत. यामुळे शेतकरी हताश होत असून, हातात आलेले पीकही नष्ट होते.milind

या गंभीर समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जानेवारी ते मे या काळात वन विभागामार्फत माकड आणि केल्टी यांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे माजी गुहागर तालुकाध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दिले असून, आंबा पिकाचे नुकसान पिक विमा योजनेत समाविष्ट करून विमा कंपनीला तशा सूचना द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हॅशटॅग :
#आंबा #रत्नागिरी #गुहागर #माकडउपद्रव #केल्टी #पिकविमा #MilindChache #RatnagiriNews

फोटो 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]